जेएन-१ चा देशात वेगाने प्रसार ;महाराष्ट्रात नव्याने दोन रुग्ण : देशभरात ३०८ नवे रुग्ण सापडले

केरळमध्ये जेएन-१ या नव्या व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. गेल्या २४ तासात राज्यात २९२ नवे रुग्ण सापडले आहेत.
जेएन-१ चा देशात वेगाने प्रसार ;महाराष्ट्रात नव्याने दोन रुग्ण : देशभरात ३०८ नवे रुग्ण सापडले
PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या जेएन-१ या नव्या व्हेरियंटच्या रुग्ण संख्येत देशात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात केरळमध्ये २९२ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गोव्यात जेएन-१ चे १९ रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात मुंबईसह सिंधुदुर्गात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. देशाची राजधानी दिल्लीत ४ रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात ३०८ नवे रुग्ण समोर आले आहेत. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी या प्रकरणी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी बैठक घेतली आहे.

केरळमध्ये जेएन-१ या नव्या व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. गेल्या २४ तासात राज्यात २९२ नवे रुग्ण सापडले आहेत. देशाची राजधानी नवी दिल्लीत देखील नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडले आहेत. दिल्लीत कोरोनाचे दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या २४ तासांत राजधानीत ३ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४ इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला. ज्यांना श्वास घेण्यास अडचणी आहेत त्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे बैठकीत सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in