राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरी यांचे निधन

पदवीनंतर ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले. १९८३ ते १९९३ दरम्यान ते केरळचे प्रांत प्रचारक होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरी यांचे निधन

कोची : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिकप्रमुख व ज्येष्ठ प्रचारक रंगा हरी यांचे येथील अमृता रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.

रंगा हरी हे आर. हरी या नावाने प्रसिद्ध होते. ५ डिसेंबर १९३० मध्ये त्यांचा जन्म झाला. सेंट अल्बर्ट हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले तर कोचीच्या महाराजास कॉलेजमध्ये त्यांना रसायनशास्त्र शाखेत प्रवेश घेतला. मात्र, १९४८ मध्ये संघावर बंदी आली तेव्हा त्यांना तुरुंगवास झाला. त्यानंतर अर्थशास्त्रात त्यांनी पदवी घेतली. पदवीनंतर ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले. १९८३ ते १९९३ दरम्यान ते केरळचे प्रांत प्रचारक होते. १९९० मध्ये ते अ. भा. सह बौद्धिक प्रमुख तर १९९१ ते २००५ दरम्यान ते अ. भा. बौद्धिक प्रमुख होते. आशिया व ऑस्ट्रेलियात त्यांनी हिंदू स्वयंसेवक संघाला त्यांनी आकार दिला. संघाच्या अ.भा. कार्यकारी मंडळाचे ते सदस्य होते.

त्यांनी विविध भाषांमध्ये ५० पुस्तके लिहिली. त्यांना गुजराती, बंगाली व आसामी भाषा बोलता येत होत्या.

जगातील पाच खंडांमध्ये त्यांनी प्रवास केला. तसेच माधव गोळवलकर, मधुकर देवरस, डॉ. राजेंद्र सिंह, के. एस. सुदर्शन व डॉ. मोहन भागवत या सरसंघचालकांसोबत त्यांनी काम केले.

त्यांच्या निधनाबद्दल सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in