ज्येष्ठ नागरिकांना मदत करणाऱ्या स्टार्टअपमध्ये रतन टाटांची गुंतवणूक

टाटा समूहातून निवृत्त झाल्यानंतर रतन टाटा स्टार्टअप्सना मदत करण्यात खूप रस घेत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना मदत करणाऱ्या स्टार्टअपमध्ये रतन टाटांची गुंतवणूक

देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांची सेवा करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या गुड फेलोमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली. रतन टाटा या प्रकल्पात किती रक्कम गुंतवत आहेत, हे सध्यातरी सांगण्यात आलेले नाही.

टाटा समूहातून निवृत्त झाल्यानंतर रतन टाटा स्टार्टअप्सना मदत करण्यात खूप रस घेत आहेत. टाटांची नवीनतम गुंतवणूक शांतनू नायडू यांनी स्थापन केलेल्या कंपनीत होत आहे. २५ वर्षीय शांतनू टाटाच्या कार्यालयात महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कॉर्नेल विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. २०१८ पासून ते रतन टाटा यांचे सहकारी म्हणून काम करत आहेत.

विशेष म्हणजे, ८४ वर्षीय रतन टाटा यांनी नायडूंच्या कल्पनेचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, जोपर्यंत तुम्ही खरोखर म्हातारे होत नाही, तोपर्यंत कोणालाही वृद्ध व्हायला आवडत नाही. शांतनूबद्दल टाटा म्हणाले की, चांगल्या स्वभावाचा सहकारी शोधणेही एक आव्हान आहे. नायडू यांनी टाटा यांचे बॉस, मार्गदर्शक आणि मित्र असे वर्णन केले आहे. नवीन स्टार्टअप ज्येष्ठ नागरिक, ग्राहकांसाठी भागीदार म्हणून काम करण्यासाठी तरुण पदवीधरांना नियुक्त करते. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कंपनी आपल्या बीटा टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून २० वृद्ध लोकांसोबत काम करत आहे. भविष्यात, कंपनी पुणे, चेन्नई आणि बंगळुरू येथेही आपली सेवा देऊ इच्छित आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in