प. बंगालमधील रेशन घोटाळ्याचा आवाका दहा हजार कोटींपर्यंत -ईडीचा दावा

प. बंगालमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या शुक्रवारी ईडीने टीएमसी नेते शहाजहान शेख यांच्या घरावर धाड घातली होती.
प. बंगालमधील रेशन घोटाळ्याचा आवाका दहा हजार कोटींपर्यंत -ईडीचा दावा

नवी दिल्ली : ५ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी तृणमूलचे नेते शंकर आध्या यांना अटक करण्यात आली होती. हा रेशन घोटाळा सुमारे ९ ते १० हजार कोटींचा असण्याचा दावा ईडीच्या पथकाने केला आहे. याच पथकावर ५ जानेवारी रोजी जमावाने हल्ला केला होता. या घोटाळ्यातील सुमारे २ हजार कोटी रुपये बांगलादेशमार्गे दुबईला हस्तांतरित करण्यात आल्याचाही दावा ईडीने केला आहे.

प. बंगालमध्ये ईडीच्या पथकावर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या शुक्रवारी ईडीने टीएमसी नेते शहाजहान शेख यांच्या घरावर धाड घातली होती. तेव्हा झालेल्या हल्ल्यात तीन ईडी अधिकारी जखमी झाले होते, तर अनेक वाहनांची नासधूस करण्यात आली होती. ईडीने पश्चिम बंगाल पोलिसांवर देखील आरोप केला आहे की ते जामीनपात्र गुन्हे दाखल करीत आहेत. तसेच एफआयआर प्रत केंद्रीय तपास यंत्रणांना बंगाल पोलीस देत नसल्याची तक्रार देखील ईडीने केली आहे. दरम्यान ईडीने परकीय चलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा शंकर आध्या यांच्या कंपनीवर दाखल करण्यात आला आहे. ही कंपनी परकीय चलन विनिमय क्षेत्रात काम करते.

logo
marathi.freepressjournal.in