Gujrat Election Results : जामनगर उत्तरमधून रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा जाडेजा विजयी

रिवाबाने काँग्रेसचे प्रतिस्पर्धी बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांच्यावर ४०,९६३ मतांनी विजय मिळवला
Gujrat Election Results : जामनगर उत्तरमधून रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा जाडेजा विजयी

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा जडेजा (Ribana Jadeja) हिच्या जामनगर उत्तर मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण रिवाबाविरोधात खुद्द नणंद नयना आणि सासरे अनिरुद्ध सिंगचे आव्हान होते, मात्र रिवाबाने काँग्रेसचे प्रतिस्पर्धी बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा यांच्यावर ४०,९६३ मतांनी विजय मिळवला आहे.

तीन वर्षांपूर्वी रिबावा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र याच मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदाराचे तिकीट कापून उमेदवारी मिळवल्यानंतर रिवाबा चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, रवींद्र जडेजा यांची बहीण नयना जडेजा निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या आणि त्या काँग्रेस पॅनलच्या यादीत होत्या, पण भाजपने रिवाबाच्या नावाची घोषणा केल्यावर काँग्रेसने नयना यांना डावलून बिपेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली. त्यानंतर नैना आणि सासरे अनिरुद्ध यांनी आक्रमकपणे काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला, मात्र तरीही रिबावा यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत काँग्रेसच्या बिपेंद्रसिंह यांचे आव्हान परतवून लावले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in