
भारतीय जनता पक्षाने (भाजप) गुजरात विधानसभा निवडणूक २०२२ लढवणाऱ्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजाला आगामी निवडणुकीसाठी तिकीट मिळाले आहे. ती जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे.
रिवाबा जडेजा मूळची जुनागढची आहे. पण तिचा जन्म राजकोटमध्ये झाला. रिवाबा जडेजा अनेक वर्ष सामाजिक कार्यात सक्रिय आहे. ती गुजरात करणी सेनेच्या महिला शाखेची अध्यक्षाही आहे. रिवाबा २०१८ मध्ये भाजपात प्रवेश केला. तर यावर्षी ती पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे. तिने २०१६मध्ये भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाशी लग्न केलं. रिवाबा जडेजाला लग्नाआधी रिवा सोलंकी या नावानेही ओळखले जात होते. हरदेवसिंग सोलंकी आणि प्रफुल्लबा सोलंकी यांच्या ती कन्या आहे. रिवाबा सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा ती त्यांच्या फॉलोवर्ससोबत संवादही साधताना दिसते.