सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता? तुमच्यासाठी गुड न्यूज: आरबीआयने PPI बाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

RBI च्या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे
सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता? तुमच्यासाठी गुड न्यूज: आरबीआयने PPI बाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) चांगली बातमी आली आहे. आता तुम्ही रेल्वे, बस, टोल, पार्किंग यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीसाठी सहज पैसे देऊ शकणार आहात. बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे पैसे देण्यासाठी PPI म्हणजेच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट उपकरणे जारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर, सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बँका असे कार्ड किंवा वॉलेट देऊ शकतात, ज्याचा वापर करून तुम्ही डिजिटल पेमेंट करून कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीची तिकिटे सहज खरेदी करू शकता. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे.

PPI मध्ये, जमा केलेल्या रकमेच्या मदतीने वस्तू किंवा सेवांसाठी पेमेंट करता येते. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक खाते यांच्या मदतीने पीपीआयमध्ये पैसे जमा करता येतात. बँका आणि NBFC द्वारे PPI जारी केले जातील. RBI कडून मंजुरी मिळाल्यानंतर बँका PPI जारी करू शकतात.

मध्यवर्ती बँकेने सांगितले की, तिकीट खरेदी करायला प्रवाशांनी रोख रकमेपेक्षा जास्तीत जास्त या मार्गाचा वापर करावा. प्रीपेड कार्डमुळे प्रवाशांना वेगाने व सुरक्षितपणे व्यवहार करता येईल. देशातील विविध वाहतूक व्यवस्थांचा वापर प्रवासी करत असतात. त्यांना प्रत्येक वेळेस वेगळे तिकीट काढावे लागते. आता प्रीपेड कार्डमुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. देशातील निरनिराळ्या सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी प्रीपेड कार्ड जारी करायला विविध बँकांना परवानगी देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in