आरबीआयचा दणका! सोन्यावर कर्ज देण्यास 'आयआयएफएल'ला बंदी

सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या ‘आयआयएफएल’ या वित्तसंस्थेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी कारवाईचा बडगा उभारला आहे.
आरबीआयचा दणका! सोन्यावर कर्ज देण्यास  'आयआयएफएल'ला बंदी

मुंबर्स : सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या ‘आयआयएफएल’ या वित्तसंस्थेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोमवारी कारवाईचा बडगा उभारला आहे. सोन्यावर कर्ज देण्यास या वित्तसंस्थेला तत्काळ बंदी घातली आहे. सोन्यावर कर्ज देताना कंपनीच्या विविध व्यवहारात अनेक अनियमितता आढळल्याने हे पाऊल आरबीआयने उचलले. मात्र, आपल्या पूर्वीच्या कर्जदारांना कंपनी सेवा देऊ शकते, असे आरबीआयने सांगितले.

आरबीआयने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून आरबीआय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापन व लेखा परीक्षकांबरोबर चर्चा करत आहे. मात्र, कंपनीच्या कामात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेऊन हे प्रतिबंध लादणे गरजेचे होते.

कर्ज मंजूर करताना व कर्ज न फेडल्यास लिलावाच्या वेळी सोन्याची शुद्धता व वजनाच्या तपासणीत गैरव्यवहार दिसले. कर्ज व मूल्यांकनाच्य रेशोचे उल्लंघन होत होते. मर्यादेपेक्षा अधिक कर्ज वितरीत होत होते. रोखीत कर्ज वितरण व संकलनाची जी मर्यादा कंपनीने भंग केली. तसेच ग्राहकांवर लादण्यात येणाऱ्या विविध शुल्कांमध्ये कमी पारदर्शकता दिसली. कंपनीच्या ५०० हून अधिक शहरात २६०० हून अधिक शाखा आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in