Bharat Jodo : या व्यक्तीच्या भारत जोडो यात्रेतील सहभागामुळे चर्चांना उधाण; राहुल गांधींसोबतचे फोटो वायरल

सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा ही राजस्थानमध्ये सुरु असून एका व्यक्तीच्या सहभागामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Bharat Jodo : या व्यक्तीच्या भारत जोडो यात्रेतील सहभागामुळे चर्चांना उधाण; राहुल गांधींसोबतचे फोटो वायरल
@INCIndia

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो' (Bharat Jodo) यात्रा ही राजस्थानमध्ये सुरु आहे. त्यांच्या या यंत्रामध्ये अनेक नागरिक, नेते, अभिनेते सहभागी होतात. मात्र, सवाई माधोपुरमधील भदौती येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) सहभागी झाले आणि विविध चर्चांना उधाण आले. काँग्रेसने सोशल मीडियावर त्यांचा सोबत असलेला फोटो वायरल केला आणि अनेकांनी यावर आपली मते व्यक्त केली. या फोटोला कॅप्शन देत काँग्रेसने लिहिले आहे की, 'द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी लोकांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या आपण यशस्वी होऊ हे दर्शवत.'

अगदी काही दिवसांपूर्वीच माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, "सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही. पण, तरीही सरकार हे सत्य स्वीकारण्यास तयार नाही. आर्थिक मंदीच्या समस्येवर मात करण्यासाठी मोदी सरकारला ही समस्या मान्य करावी लागेल. कारण ती लपवून ठेवल्याने परिस्थितीमध्ये सुधारणा होणार नाही. जगभरात भारताची प्रतिमा 'अल्पसंख्यांक विरोधी' म्हणून तयार झाली आहे. असे असेल तर भारतीय कंपन्यांना मोठे नुकसान होऊ शकते. भारतीय उत्पादनांसाठी मार्केटमध्ये ही धोक्याची घंटा आहे. भारताची अशी प्रतिमा झाल्यानंतर इतर देशांची सरकार आपल्या राष्ट्रावर विश्वास ठेवायला सहज तयार होणार नाहीत. यामुळे गुंतवणूकदार आपल्याकडे गुंतवणुकीच्या दृष्टीने बघणे बंद करु शकतात." असे सल्ले त्यांनी दिले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in