RBI च्या कडक नियमामुळे आता डिजिटल फसवणूकीला आळा; सर्वसमावेशक नियमावली अखेर जाहीर

डिजिटल व्यवहारांमधील वाढत्या सायबर धोक्यांना आळा घालण्यासाठी आणि सुरक्षेत वाढ करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एक सर्वसमावेशक नियमावली जाहीर केली आहे.
RBI च्या कडक नियमामुळे आता डिजिटल फसवणूकीला आळा; सर्वसमावेशक नियमावली अखेर जाहीर
RBI च्या कडक नियमामुळे आता डिजिटल फसवणूकीला आळा; सर्वसमावेशक नियमावली अखेर जाहीर
Published on: 

नवी दिल्ली : डिजिटल व्यवहारांमधील वाढत्या सायबर धोक्यांना आळा घालण्यासाठी आणि सुरक्षेत वाढ करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एक सर्वसमावेशक नियमावली जाहीर केली आहे.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नॉन-बँक पेमेंट सिस्टम ऑपरेटरना सायबर हल्ले, सिस्टीम बिघाड आणि व्यवहारांमधील विलंब यांसारख्या असामान्य घटना घडल्यास त्या शोध लागल्यापासून सहा तासांच्या आत मध्यवर्ती बँकेला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सर्व नॉन-बँक पेमेंट सिस्टम ऑपरेटरना कोणत्याही सायबर घटनेची माहिती निश्चित नमुन्यात सहा तासांच्या आत आरबीआय आणि 'सर्ट-इन'कडे द्यावी लागेल.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय), कार्ड नेटवर्क्स, पेमेंट ॲग्रिगेटर्स, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) जारी करणाऱ्या संस्था आणि व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर यांना ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होतात. महत्त्वाच्या थर्ड-पार्टी ॲप्लिकेशनचे स्त्रोत कोड सुरक्षित ठेवणे किंवा एस्क्रोमध्ये ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ग्राहकांनी नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल बदलल्यास १२ तासांचा अनिवार्य कूलिंग-ऑफ पिरियड लागू राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या नियमांमुळे जुन्या प्रतिसादात्मक सुरक्षेवरून सक्रिय सायबर रेझिलियन्सकडे बदल झाला आहे.

सोर्स कोड सुरक्षितता : थर्ड-पार्टी सॉफ्टवेअरमधील त्रुटी टाळण्यासाठी सोर्स कोड सुरक्षित ठेवणे बंधनकारक.

वार्षिक लेखापरीक्षण : पीएसओला आर्थिक वर्ष संपल्यानंतर दोन महिन्यांत वार्षिक सिस्टीम ऑडिट अहवाल सादर करावा लागेल.

मोबाईल नंबर बदल नियम : ग्राहकाने नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल पत्ता बदलल्यानंतर १२ तासांचा अनिवार्य कूलिंग-ऑफ पिरियड कायम ठेवण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन : प्राथमिक डेटा सेंटरपेक्षा पूर्णपणे वेगळ्या सिस्मझिक झोनमध्ये (भूकंपीय क्षेत्र) डिझास्टर रिकव्हरी सुविधा ठेवावी लागेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)