३०, ३१ मार्चला आरबीआय कार्यालये सुरू राहणार

३० आणि ३१ मार्च २०२४ रोजी सरकारी चेकसाठी विशेष क्लिअरिंग आयोजित केले जाईल.
३०, ३१ मार्चला आरबीआय कार्यालये सुरू राहणार

मुंबई : सरकारी कामकाजाशी संबंधित आरबीआय कार्यालये आणि बँकांच्या सर्व शाखा शनिवारी आणि रविवारी सामान्य कामकाजाच्या वेळेनुसार सुरू राहतील. त्यामुळे करदात्यांची सोय होईल, असे आरबीआयने म्हटले आहे.

रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी (२०२३-२४) सरकारी वार्षिक वित्तीय व्यवहार बंद होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना केल्या आहेत. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही दिवस (३० मार्च आणि ३१ मार्च) निर्धारित वेळेपर्यंत इलेक्ट्रॉनिक व्यवहार केले जाऊ शकतात.

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) प्रणालीद्वारे होणारे व्यवहार ३१ मार्च २०२४ पर्यंत २४ तासांपर्यंत चालू राहतील. करदात्यांना अधिक सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे आरबीआयने म्हटले आहे. सरकारी रक्कम स्वीकारणे आणि देयके देणे सुलभ करण्यासाठी देशभरात विशेष क्लिअरिंग ऑपरेशन्स करण्यासाठी आवश्यक व्यवस्था देखील करण्यात आली आहे, असेही त्यात म्हटले आहे.

३० आणि ३१ मार्च २०२४ रोजी सरकारी चेकसाठी विशेष क्लिअरिंग आयोजित केले जाईल. बँकांना याद्वारे सूचित केले जाते की अशा क्लिअरिंगवर सरकारी खात्यांशी संबंधित सर्व धनादेश सादर केले जातील. केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यवहारांचा आरबीआयला अहवाल देण्याबाबत ३१ मार्चची ‘रिपोर्टिंग विंडो’ १ एप्रिल २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवली जाईल, असे आरबीआयने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in