आरबीआय करणार यूपीआयद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट सुविधा सुरू

बँक खात्यात पैसे नसले किंवा तुमच्याकडे डेबिट कार्ड नसले तरीही यूपीआयद्वारे क्रेडिट कार्डने पैसे भरू शकाल
आरबीआय करणार यूपीआयद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट सुविधा सुरू

आरबीआयने यूपीआयद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. याची सुरुवात रुपे क्रेडिट कार्डने केली जाईल. ही सुविधा सुरू केल्यानंतर, तुमच्या बँक खात्यात पैसे नसले किंवा तुमच्याकडे डेबिट कार्ड नसले तरीही यूपीआयद्वारे क्रेडिट कार्डने पैसे भरू शकाल.

विशेष बाब म्हणजे पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड सर्वत्र वापरले जात नाही, तर यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही कुठेही आणि कोणत्याही क्षेत्रात पैसे भरू शकता. क्रेडिट कार्डद्वारे खर्च केल्यानंतर, त्याची परतफेड करण्यासाठी ४५-५० दिवसांचा कालावधी देखील मिळतो. आतापर्यंत यूपीआयद्वारे पेमेंट फक्त बँक खात्यांद्वारे केले जाते. म्हणजे तुमच्या खात्यात जेवढे पैसे असतील तेवढे तुम्ही खर्च करू शकता.

फिनटेक कंपन्यांपासून मुक्त व्हाल

सध्या बँकांना फोनपे, गुगलपे सारख्या फिनटेक कंपन्यांसोबत काम करावे लागते, ज्या ग्राहकांकडून जास्त शुल्क आकारतात; परंतु नवीन फीचरनंतर संपूर्ण सिस्टीम बदलू शकते. रुपे क्रेडिट कार्डद्वारे बँका थेट ग्राहकांना खर्चासाठी काही मर्यादादेखील देऊ शकतात. दुसरीकडे, एनपीसीआायला व्यापाऱ्यांकडून कार्ड व्यवहार शुल्क दिले जाईल (इंटरचेंज चार्ज), ज्यामुळे त्याची कमाई वाढेल.

इंटरचेंज फी भरण्याची गरज नाही

यूपीआय पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्याच वेळी, क्रेडिट कार्ड व्यवहारांवर दोन टक्क्यांपर्यंत इंटरचेंज शुल्क आहे, जे व्यापारी ग्राहकांकडून वसूल करतात. नवीन प्रणालीमध्ये यूपीआयद्वारे क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरण्याऐवजी आता व्यापाऱ्याला हे शुल्क भरावे लागणार आहे. अशा परिस्थितीत, लहान दुकानदार यूपीआयद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटची ही नवीन प्रणाली स्वीकारणार नाहीत.

ही सुविधा सुरु करण्यासाठी यूपीआय अॅपसोबत कार्ड लिंक करावे लागेल. त्यासाठी सर्व प्रथम यूपीआय पेमेंट अॅप उघडावे लागेल. त्यानंतर प्रोफाईल पिक्चरवर क्लीक करा. त्यानंतर पेमेंट सेटिंग पर्यायावर जावे लागेल. त्यानंतर क्रेडिट/डेबिट कार्ड जोडा पर्याय निवडावा लागेल. क्रेडिट कार्ड क्रमांक, कार्ड वैधता तारीख, CVV क्रमांक आणि कार्डधारकाचे नाव यासह इतर तपशील भरावे लागेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in