सोनिया गांधी तेलंगणातून लोकसभा लढणार?; तेलंगणा प्रदेश काँग्रेसचा ठराव

सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा ठराव आम्ही मंजूर केल्याचे काँग्रेस नेते मधु यक्षी गौर यांनी सांगितले.
Sonia Gandhi
Sonia GandhiANI
Published on

नवी दिल्ली : तेलंगणा प्रदेश काँग्रेसने सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा ठराव केला आहे. त्यामुळे सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोनिया गांधी तेलंगणातील मेडक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही याच जागेवरून निवडणूक लढवली होती.

सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा ठराव आम्ही मंजूर केल्याचे काँग्रेस नेते मधु यक्षी गौर यांनी सांगितले. सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवल्यास त्याचा फायदा संपूर्ण दक्षिण भारतात काँग्रेस-इंडिया आघाडीला होईल, असेही त्यांनी म्हटले. सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या खासदार आहेत. रायबरेली ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्या चार निवडणुकांत सोनिया येथून विजयी होत आहेत. येथील प्रत्येक निवडणुकीत त्यांना ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ही जागा ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेसकडेच आहे. देशात आतापर्यंत झालेल्या १७ लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ ३ निवडणुकांचा अपवाद वगळता ही जागा प्रत्येकवेळी काँग्रेसकडे आहे. देशाच्या ७२ वर्षांच्या निवडणूक इतिहासात उत्तर प्रदेशची रायबरेली ही जागा ६६ वर्षांपासून काँग्रेसकडे आहे.

logo
marathi.freepressjournal.in