मुंबईसह पाच हायकोर्टांच्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस

तेलंगणा हायकोर्टातील वरिष्ठ न्यायाधीश एम.एस. रामचंद्र राव यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीची शिफारस केली
मुंबईसह पाच हायकोर्टांच्या मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने मुंबई हायकोर्टासह पाच हायकोर्टांच्या मुख्य न्यायमूतींच्या नियुक्तीची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायवृंदाने ही शिफारस केली आहे. मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी आर.डी.धनुका यांच्या नावाची शिफारस केली आहे.

सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती संजय कौल आणि के.एस.जोसेफ यांच्या कॉलेजियमने मद्रास, केरळ, मुंबई, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती नेमण्याची शिफारस केली आहे. आंध्रप्रदेश हायकोर्टातील वरिष्ठ न्यायाधीश एस.व्ही.भट्टी यांची केरळ हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टातील न्यायाधीश ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांची राजस्थान हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीची शिफारस केली आहे. तेलंगणा हायकोर्टातील वरिष्ठ न्यायाधीश एम.एस. रामचंद्र राव यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीची शिफारस केली आहे. मुंबई हायकोर्टातील न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला यांची मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीची शिफारस केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in