पाक व्याप्त काश्मीर बाबत व्ही. के सिंह यांचं मोठं विधान ; म्हणाले, "लवकरच..."

राजस्थानच्या दौसा येथे देशाच नुकत्याच पार पडलेल्या जी-२० परिषदेबाबत माहिती देताना त्यांनी पाक व्याप्त काश्मीर बाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
पाक व्याप्त काश्मीर बाबत व्ही. के सिंह यांचं मोठं विधान ; म्हणाले, "लवकरच..."

पाकव्याप्त काश्मीर(POK) भारतात कधी सामील होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काश्मीरला विशेष राज्याजा दर्जा देणार अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकव्याप्त काश्मीर भारतात कधी विलीन होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित होत असतो. आता देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के सिंह(V K Sing) यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. काही काळ थांबा... पीओके भारतात विलीन होईल, असं सिंग यांनी म्हटलं आहे.

राजस्थानच्या(Rajsthan) दौसा(Dausa) येथे बोलताना त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील शिया मुस्लिमांसाठी भारतात येण्याचा मार्ग खुला करण्याबाबतचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे. पाक व्याप्त काश्मीर भारतात विलीन होणार आहे. त्यासाठी थोडा वेळ प्रतिक्षा करा, असं त्यांनी म्हटलं आहे.

देशाच नुकत्याच पार पडलेल्या जी-२० परिषदेबाबत(G-20 Conference) माहिती देताना ते म्हणाले की, जी-२० बैठक यशस्वी झाली असून असा संघटित कार्यक्रम यापूर्वी कधीही झाला नव्हता. देशातील ६० शहरांमध्ये सुमारे २०० बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. भारताने जी-२० परिषदेचं आयोजन उत्तम प्रकारे केल्याबद्दल इतर देशांनी देखील कौतु केल्याचं ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in