
भारतातील नैसर्गिक वायू दरवाढात ऑक्टोबरमध्ये वाढ होण्याची आणि वायू विक्रीबाबत असलेले दरनियंत्रण (सिलिंग) सरकारकडून उठविण्यात यावे अशी अपेक्षा रिलायन्स इंडस्ट्रीज लि.ला व्यक्त केली आहे. दरनियंत्रण उठविल्यास देशांतर्गत दर हे जागतिक ऊर्जा दरांच्या बरोबरीने होतील, असेही रिलायन्स इंडस्ट्रीजचे म्हणणे आहे.
अब्जोपती मुकेश अंबानी प्रमुख असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे म्हणणे आहे की, केजी-डी ६ मधील उत्पादन होणाऱ्या गॅस विक्रीबाबत जे दरनियंत्रण उठविण्यात यावे कारण सध्या हा दर ९.९२ अमेरिकन डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिटस् (बीटीयू) आहे, असे संजय रॉय, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, एक्सप्लोरेशन अॅण्ड प्रॉडक्शन, रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी म्हटले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही निकाल दमदार लागल्यानंतर संजय रॉय यांनी शुक्रवारी वरील मागणी केली.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निव्वळ नफ्यात ४६ टक्के वाढ
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा ४६.३ टक्क्यांनी वाढून १७,९५५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा १२,२७३ कोटी रुपये होता. या कालावधीत, कंपनीचा परिचालन महसूल ५४.५ टक्क्यांनी वाढून रु. २२३,११३ कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत रु. १४४,३७२ कोटी होता. त्याचवेळी मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीने २११,८८७ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता.