मुकेश अंबानींच्या रिलायन्सची मोठी डील! 'पॅरामाउंट ग्लोबल'चा 'वायकॉम 18' मधील १३ टक्के हिस्सा ४,२८६ कोटींना विकत घेणार

पॅरामाऊंट ग्लोबलने आपल्या भारतीय टीव्ही व्यवसायातील १३ टक्के हिस्सा रिलायन्स इंडस्ट्रीजला ४,२८६ कोटी रुपयांना विकण्यास संमती दिली
मुकेश अंबानींच्या रिलायन्सची मोठी डील!  'पॅरामाउंट ग्लोबल'चा 'वायकॉम 18' मधील १३ टक्के हिस्सा ४,२८६ कोटींना विकत घेणार

नवी दिल्ली : पॅरामाऊंट ग्लोबलने आपल्या भारतीय टीव्ही व्यवसायातील १३ टक्के हिस्सा रिलायन्स इंडस्ट्रीजला ४,२८६ कोटी रुपयांना विकण्यास संमती दिली आहे, असे कंपनीने गुरुवारी सांगितले.

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल)ने पॅरामाऊंट ग्लोबलच्या दोन उपकंपन्यांसोबत पॅरामाऊंट ग्लोबलच्या वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे १३.०१ टक्के समभाग हिस्सा विकत घेण्यासाठी बंधनकारक करार केला आहे. त्याचप्रमाणे, यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन (एसईसी) वरील फाइलिंगमध्ये, पॅरामाऊंट ग्लोबलने सांगितले की, व्यवहार पूर्ण करणे लागू नियामक मंजुरी प्राप्त करणे या अटींच्या पूर्णत्त्वावर आणि यापूर्वी घोषित झालेल्या रिलायन्स, वायकॉम 18 आणि स्टार डिस्ने यांचा संयुक्त उपक्रम यांच्या विलीनीकरण पूर्णत्त्वावर अवलंबून असणार आहे. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर पॅरामाऊंट त्याच्या सामग्रीचा वायकॉम 18 ला परवाना देणे सुरू ठेवेल, असे म्हटले आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये, वॉल्ट डिस्ने कंपनी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने ७० हजार कोटींची कंपनी तयार करण्यासाठी भारतातील त्यांच्या मीडिया ऑपरेशन्स विलीन करण्यासाठी बंधनकारक करारांवर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, पॅरामाऊंट ग्लोबलने भारतीय टीव्ही व्यवसायातील १३ टक्के हिस्सा कंपनीला विकण्यास सहमती दर्शविल्याच्या वृत्तानंतर रिलायन्सच्या समभागात गुरुवारी दिवसभरात १ टक्क्यांनी वाढ झाली होती. बीएसईवर कंपनीचे शेअर्स १.१३ टक्क्यांनी वाढून २,८९७.३५ रुपयांवर पोहोचले. त्यानंतर दिवसअखेरीस समभाग अवघ्या ०.०२ टक्क्यानी वाढून २,८६५.२५ वर बंद झाला. एनएसईवरही हा समभाग १.१४ टक्क्यांनी वाढून २,८९७.०५ रुपयांवर पोहोचल्यानंतर ०.२० टक्क्यानी वाढून प्रत्येकी २,८७० रुपयांवर बंद झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in