रिलायन्सने गाठला माईलस्टोन! 'हा' टप्पा गाठणारी देशातील पहिली कंपनी

दुसऱ्या स्थानावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) असून त्यांचे बाजारमूल्य १५.०७ लाख कोटी रुपये आहे.
रिलायन्सने गाठला माईलस्टोन! 'हा' टप्पा गाठणारी देशातील पहिली कंपनी
Published on

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजारमूल्य २० लाख कोटी रुपयांहून अधिक गेले आहे. मंगळवारी कंपनीच्या समभागांनी २९५८ रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य २० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. हा टप्पा गाठणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे.

यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीने १५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. नोव्हेंबर २०१९ मध्ये रिलायन्सचे बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) असून त्यांचे बाजारमूल्य १५.०७ लाख कोटी रुपये आहे. या यादीत १०.५६ लाख कोटींसह एचडीएफसी बँक तिसऱ्या स्थानावर आहे, तर आयसीआयसीआय बँक ६.९८ लाख कोटी आणि इन्फोसिस ६.९७ लाख कोटींसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

logo
marathi.freepressjournal.in