धार्मिक असंतुलन नजरेआड करून चालणार नाही - मोहन भागवत यांचे मत

नागपूरच्या रेशीमबाग मैदानात बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडला
धार्मिक असंतुलन नजरेआड करून चालणार नाही - मोहन भागवत यांचे मत

“देशात धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही. एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल तयार होतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमादेखील बदलून जातात. देशात लोकसंख्या धोरण तयार व्हायला पाहिजे. ते सर्वांसाठी समान पद्धतीने लागू व्हावे, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.

नागपूरच्या रेशीमबाग मैदानात बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडला. त्यावेळी सरसंघचालकांनी स्वयंसेवकांचे प्रबोधन केले. ते म्हणाले की, “चीनने लोकसंख्या नियंत्रण धोरण बदलून लोकसंख्यावाढीचे धोरण स्वीकारले आहे. आपल्या देशातील लोकसंख्येचा देशहिताच्या दृष्टीने विचार करता येणे शक्य आहे. आज भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. ५० वर्षांनंतर आजचा युवक वर्ग ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत दाखल होईल, तेव्हा त्यांचा सांभाळ करण्यासाठी किती तरुणांची गरज असेल याचाही विचार आपल्याला आज करावा लागेल.”

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in