

थिरुअनंतपुरम : केरळबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री नितेश राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केली आहे.
राणे यांनी केरळ हे मिनी पाकिस्तान असल्याची टीका केली होती. त्यांच्या विधानावरून राजकीय क्षेत्रात जोरदार टीका होत आहे.
केरळचे मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, केरळला बदनाम करण्याचा हा डाव आहे. हा संघ परिवाराचा अजेंडा आहे. राणे यांचे वक्तव्य आक्षेपार्ह व निंदनीय आहे. याप्रकारची वादग्रस्त वक्तव्ये करून संघ परिवार केरळच्या विरोधात अजेंडा चालवत आहे. संघाच्या या द्वेषमूलक वक्तव्याच्याविरोधात केरळच्या जनतेने एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, असे ते म्हणाले.
नितेश राणे यांच्या वक्तव्यावर मौन बाळगणाऱ्या केंद्र सरकारही विजयन यांनी टीका केली. जे मंत्री वादग्रस्त वक्तव्य करतात, ते पद सांभाळण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांची हकालपट्टी करावी, असे विजयन म्हणाले.