भारतीय युद्धनौकेद्वारे इराणच्या नौकेची सुटका; सोमालियाजवळ नौदलाची सागरी चाच्यांविरुद्ध कारवाई

भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या इराणच्या मच्छीमार नौकेची सुटका केली.
भारतीय युद्धनौकेद्वारे इराणच्या नौकेची सुटका; सोमालियाजवळ नौदलाची सागरी चाच्यांविरुद्ध कारवाई

मुंबई : भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ सागरी चाच्यांनी अपहरण केलेल्या इराणच्या मच्छीमार नौकेची सुटका केली.

इराणची मच्छीमार नौका एडनच्या आखातात, सोमालियाच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करत असताना तिचे काही सागरी चाच्यांनी अपहरण केले. मच्छीमार नौकेवरील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी जारी केलेला संदेश रविवारी रात्री त्याच परिसरात गस्त घालत असलेल्या भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेला मिळाला. त्यानुसार आयएनएस सुमित्राने अपहरण झालेल्या नौकेचा माग काढून तिच्यावर नौसैनिकांना उतरवले आणि चाच्यांच्या तावडीतून १७ कर्मचाऱ्यांची सुटका केली. भारतीय नौसैनिकांनी अपहरण झालेल्या नौकेची तपासणी करून सुरक्षेची खात्री पटल्यानंतर तिला पुढील प्रवासासाठी रवाना केले.

हमास-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून अरबी समुद्रात चाचे आणि तांबड्या समुद्रात हुथी बंडखोरांच्या कारवाया वाढल्या आहेत. हुथी बंडखोरांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आग लागलेल्या ब्रिटनच्या मर्लिन लुआंडा नावाच्या तेलवाहू जहाजावर भारतीय नौदलाच्या आयएनएस विशाखापट्टणम या युद्धनौकेवरील नौसैनिकांनी उतरून नुकतीच यशस्वी कारवाई केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in