रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! सगल तिसऱ्यांदा रेपो दरात कुठलीही वाढ नाही

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीदास यांनी भारतीय अर्थव्यवस्था गतिमान असल्याने आनंद होत असल्याचं सांगितलं
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! सगल तिसऱ्यांदा रेपो दरात कुठलीही वाढ नाही

अर्थतज्ञांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीने सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये कुठलीही वाढ केलेली नाही. तज्ज्ञांनी यापूर्वीच हा अंदाज वर्तवला होता. गेल्या दोन महिन्यात महागाई वाढली असली तरी भारतीय अर्थधोरणावर याचा परिणाम होणार नाही, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला होता. आता आरबीआयने ६.५० टक्के हा रेपो रेट कायम ठेवला आहे. यापूर्वी देखील एप्रिल आणि जून महिन्यात देखील व्याजदरात कुठलीही वाढ झालेली नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात ०.२५ टक्के वाढ करण्यात आली होती. RBIने मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत व्याजदरात २.५० टक्क्यांची वाढ केली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीदास यांनी भारतीय अर्थव्यवस्था गतिमान असल्याने आनंद होत असल्याचं सांगितलं होतं. यावेळी जगासाठी भारत 'ग्रोथ इंजिन' ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. आरबीआयने मे २०२२ मध्ये मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात वाढ केली होती. २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात महागाई कमी करण्याच्या कारणाने आरबीआयने ६ वेळा रेपो दरात वाढ केली होती. यामुळे रेपो रेट 6.50 टक्क्यांवर पोहचला आहे. मात्र, त्यानंतर रेपो दरात वाढ झालेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in