किरकोळ महागाईचा चार महिन्यांचा उच्चांक; डिसेंबरमध्ये महागाई दर ५.६९ टक्के

मुख्यतः खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ किरकोळ महागाई दर डिसेंबर २०२३ मध्ये चार महिन्यांच्या उच्चांकावर जात ५.६९ टक्क्यांपर्यंत वाढला.
किरकोळ महागाईचा चार महिन्यांचा उच्चांक; डिसेंबरमध्ये महागाई दर ५.६९ टक्के

नवी दिल्ली : मुख्यतः खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ किरकोळ महागाई दर डिसेंबर २०२३ मध्ये चार महिन्यांच्या उच्चांकावर जात ५.६९ टक्क्यांपर्यंत वाढला. शुक्रवारी ग्राहक किंमत निर्देशांकाची (सीपीआय) अधिकृत आकडेवारी जाहीर झाली. सीपीआय आधारित किरकोळ महागाई दर नोव्हेंबर २०२३ मध्ये ५.५५ टक्के आणि डिसेंबर २०२२ मध्ये ५.७२ टक्के होता. ऑगस्ट २०२३ मध्ये महागाई दराने ६.८३ टक्क्यांचा उच्चांक गाठला होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये अन्न विभागामधील किरकोळ महागाई दर ९.५३ टक्के होता, जो मागील महिन्यातील ८.७ टक्के आणि मागील वर्षीच्या महिन्यात ४.९ टक्के होता. किरकोळ चलनवाढ दोन्ही बाजूंनी २ टक्क्यांच्या फरकाने ४ टक्क्यांवर राहण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in