रेवंत रेड्डी तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदी; इतर १२ आमदारांनी देखील घेतली उपमुख्यमंत्री पदासह मंत्रीपदाची शपथ

आज(७ डिसेंबर) रोजी दुपारी १ वाजून ४ मिनीटांनी भव्य अशा एलबी स्टेडियममध्ये रेवंत रेड्डी यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
रेवंत रेड्डी तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदी; इतर १२ आमदारांनी देखील घेतली उपमुख्यमंत्री पदासह मंत्रीपदाची शपथ
Published on

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र तेलंगणात बीआरएस पक्षाची सत्ता हाणून पाडत काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळलवं. तेलंगणात काँग्रेसने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात सिंहाचा वाटा असलेल्या रेवंत रेड्डी याचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषीत करण्यात आलं होतं. त्यानुसार आज रेवंत रेड्डी यांनी आज तेलंगाच्या मख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भट्टी विक्रमार्क मल्लू यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासोबत काँग्रेसच्या इतर ११ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. आज(७ डिसेंबर) रोजी दुपारी १ वाजून ४ मिनीटांनी भव्य अशा एलबी स्टेडियममध्ये रेवंत रेड्डी यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

रेवंथ रेड्डी यांना तेलंगणाच्या काँग्रेसला पहिला मुख्यमंत्री होण्याचा तसंच २०१४ साली झालेल्या आंध्रप्रदेशच्या विभाजनानंतर स्थापन झालेल्या तेलंगणाच्या दुसरा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला आहे.

रेवंत रेड्डी यांचं मंत्रिमंडळ

  1. रेवंत रेड्डी - मुख्यमंत्री

  2. भट्टी विक्रमार्क मल्लू- उपमुख्यमंत्री

  3. नालामाडा उत्तम कुमार रेड्डी - मंत्री

  4. सी दामोदर राजनरसिम्हा

  5. कोमटिरेड्डी वेंकट रेड्डी

  6. दुद्दिला श्रीधर बाबू

  7. पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी

  8. पूनम प्रभाकर

  9. कोंडा सुरेखा

  10. डी. अनसूया सीताक्का

  11. तुम्मला नागेश्वर राव

  12. जुपल्ली कृष्ण राव

  13. गद्दाम प्रसाद कुमार

logo
marathi.freepressjournal.in