खाणी उत्पादनाचा कोळसा मंत्रालयाकडून आढावा

३१ डिसेंबर रोजी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ५० कॅप्टीव्ह/ व्यावसायिक कोळसा खाणींमध्ये उत्पादन सुरू आहे
खाणी उत्पादनाचा कोळसा मंत्रालयाकडून आढावा

नवी दिल्‍ली : व्यावसायिक कोळसा खाणींमधील उत्पादन आणि भावी काळातील अपेक्षित उत्पादनांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि नामांकित अधिकारी एम. नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचे ३ जानेवारी रोजी येथे आयोजन करण्यात आले. या बैठकीत त्यांनी कोळसा खाणधारकांची कोळसा उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाल्याबद्दल प्रशंसा केली आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ चे कोळसा उत्पादनाचे समर्पित लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची सूचना केली.

३१ डिसेंबर रोजी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ५० कॅप्टीव्ह/ व्यावसायिक कोळसा खाणींमध्ये उत्पादन सुरू आहे आणि त्यापैकी ३२ खाणींचे वाटप ऊर्जा क्षेत्रामध्ये, ११ खाणींचे बिगर नियंत्रित क्षेत्रात आणि सात खाणींचे कोळसा विक्रीसाठी करण्यात आले आहे. २०२० मध्ये व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाला सुरुवात झाल्यानंतर सहा खाणींनी १४.८७ दशलक्ष टन क्युम्युलेटिव्ह पीक रेटेड क्षमतेसह यापूर्वीच उत्पादन सुरू केले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये कॅप्टीव्ह आणि व्यावसायिक खाणींमधून १४.०४ दशलक्ष टन उत्पादन झाले, जे गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील १०.१४ दशलक्ष टनांच्या तुलनेत ३८ टक्क्यांनी जास्त होते. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात कॅप्टीव्ह आणि व्यावसायिक कोळसा खंडांमधून कोळशाचे उत्पादन आणि पाठवणीमध्ये उल्लेखनीय वाढ दिसून आली. १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात कॅप्टीव्ह आणि व्यावसायिक कोळसा खाणींमधून ९८ दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले.

logo
marathi.freepressjournal.in