नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली पक्षांतरबंदी कायद्याचा आढावा;लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची घोषणा

पक्षांतरबंदी कायद्याच्या आढाव्यासाठी नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करेल.
नार्वेकरांच्या अध्यक्षतेखाली पक्षांतरबंदी कायद्याचा आढावा;लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची घोषणा

मुंबई : पक्षांतरबंदीविरोधी कायद्याच्या आढाव्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवली जाईल, अशी मोठी घोषणा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी रविवारी केली.

८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते. राज्यघटनेच्या दहाव्या सूचीत त्यांच्या राजकीय पक्षातून निवडून आलेल्या आणि नामनिर्देशित सदस्यांच्या पक्षांतरास प्रतिबंध करण्याची तरतूद आहे आणि त्यात आमदारांच्या पक्षांतराच्या धोक्याला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदी आहेत.

आता पक्षांतरबंदी कायद्याच्या आढाव्यासाठी नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करेल. पक्षांतरबंदीविरोधी कायद्यांतर्गत जानेवारीत नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवणाऱ्या याचिकांवर निकाल दिला होता. नार्वेकर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या याचिकांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षेबाबत ते म्हणाले की, संसदेची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत बनवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. गेल्या १३ डिसेंबर रोजी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उडी टाकली होती. यातून संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींची देशभरात चर्चा झाली.

logo
marathi.freepressjournal.in