सोन्या-चांदीच्या दरात तेजी; सोने ९८०, तर चांदी ३,७९० रुपयांनी महाग

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,७१० डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे.
सोन्या-चांदीच्या दरात तेजी; सोने ९८०, तर चांदी ३,७९० रुपयांनी महाग

दसऱ्याच्या एक दिवस आधी देशाची राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, मंगळवारी सोन्याचा भाव ९८० रुपयांनी वाढून ५१,७१८ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. मागील सत्रात सोन्याचा भाव ५०,७३८ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​होता. मंगळवारी चांदीच्या दरातही वाढ झाली. चांदी ३,७९० रुपयांनी वाढून ६१,९९७ रुपये प्रति किलो झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,७१० डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. तर चांदी प्रति औंस २०.९९ डॉलर होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार यांच्या मते, मार्चपासून कॉमेक्सवर सोन्याचा भाव सर्वाधिक वाढला आहे. यूएस ट्रेझरी यील्ड आणि डॉलर इंडेक्समध्ये सातत्याने घसरण झाल्याने सोने मजबूत झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in