राजधानीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ

राजधानीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर ५२,०४८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

देशाची राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात २४१ रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर ५२,०४८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. याआधी, मागील व्यवहाराच्या दिवशी सोने ५१,८०७ रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात होते. केंद्र सरकारने सोन्याच्या आयातीवर अबकारी करात वाढ केल्यानंतर सोन्याच्या किंमतीतील तेजी कायम आहे. चांदीच्या दरातही सोमवारी २५४ रुपयांनी वाढ झाली आहे. चांदी सध्या ५८,१८९ रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. यापूर्वीच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव प्रतिकिलो ५७,८८५ रुपये होता.

दरम्यान, मुंबई सराफा बाजारात सोमवारी सोने-चांदीच्या दरातही वाढ झाली. सोने वधारुन प्रति दहा ग्रॅमचा दर ५२,२१८ रुपये झाला. शुक्रवारी हा भाव ५१,७९१ रुपये होता. तसेच चांदीचा भाव प्रति किलो ५८,१२३ रुपये झाला. शुक्रवारी हा दर ५७,७७३ रुपये होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १८०८.४५ डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर १९.८३ डॉलर प्रति औंस आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, डॉलरमधील कमजोरी आणि जागतिक मंदीच्या भीतीने सोन्याच्या किमती स्थिर आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in