वाढते व्याजदर आणि एनपीएम सुधारणांमुळे बँकांच्या समभागांची जोरदार खरेदी सुरु

बीएसई बँक इंडेक्स २०२२ च्या प्रारंभापासून आतापर्यंत ५ टक्के वधारला असून बीएसई सेन्सेक्स तुलनेने चार टक्के घसरला आहे
 वाढते व्याजदर आणि एनपीएम सुधारणांमुळे  बँकांच्या समभागांची जोरदार खरेदी सुरु

बँकांच्या सर्व प्रकारच्या कर्जांवरील वाढत्या व्याजदरामुळे आणि एनपीएमध्ये झालेल्या सुधारणांमुळे बँकांच्या समभागांची जोरदार खरेदी होत आहे. याशिवाय, किरकोळ कर्ज वितरणात वाढ, पतपुरवठ्यात गुणवत्तापूर्ण सुधारणा ही कारणेही त्यामागे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बीएसई बँक इंडेक्स २०२२ च्या प्रारंभापासून आतापर्यंत ५ टक्के वधारला असून बीएसई सेन्सेक्स तुलनेने चार टक्के घसरला आहे. काही बँकांपैकी बँक ऑफ बडोदाचा समभाग वरील कालावधीत तब्बल ३० ते ४० टक्के वाढला आहे, असे शेअर बाजारातील आकडेवारीवरुन दिसते. आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि एसबीआयची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत आहे. बँक ऑफ बडोदाचा समभाग २०२२ मध्ये आतापर्यंत ४२ टक्के, फेडरल बँकेचा २९ टक्के आणि करुर वैश्य बँकेचा समभाग १८ टक्के वाढला आहे. यंदा एचडीएफसी बँकेचा समभाग ६ टक्के, आरबीएल बँकेचा तब्बल २८ टक्के घसरला. तर आयडीएफसी बँकेचा बीएसईवर २६ टक्के वाढला. तसेच कॅनरा बँकेचा १५ टक्के, बंधन बँकेचा १३ टक्के आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा १२ टक्के, आयसीआयसीआय बँक, ॲक्सीस बँक आणि येस बँकेचा समभाग ७ ते ८ टक्के वधारला. इंडस‌्इंड बँकेचा सहा टक्के, कोटक महिंद्रा बँकेच्या समभागात दोन टक्के वाढ झाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in