भारतीय बाजारपेठेत तांदळाच्या किमतीत वाढ,बांगलादेशात तुटवडा

भारतीय बाजारपेठेत तांदळाच्या किमती सरासरी १० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.
भारतीय बाजारपेठेत तांदळाच्या किमतीत वाढ,बांगलादेशात तुटवडा

गेल्या पाच दिवसांत भारतीय बाजारपेठेत तांदळाच्या किमती १० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातून येणाऱ्या तांदळाच्या किमतीत वाढ होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय बाजारपेठेतील तांदळाच्या किमती वाढण्याचे कारण शेजारी देश बांगलादेश आहे. वास्तविक, देश बांगलादेश सहसा पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार या भारतीय राज्यांमधून तांदूळ खरेदी करून तांदळाची गरज भागवतो. सध्या या तिन्ही राज्यांमध्ये तांदळाच्या किमती गेल्या काही दिवसांत २० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्यामुळे देशाच्या अन्य राज्यातही तांदळाच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत तांदळाच्या किमती सरासरी १० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

वृत्तानुसार, बांगलादेशमध्ये सध्या तांदळाचा तुटवडाआहे. त्यामुळे तेथे तांदूळ महाग होत आहे. बांगलादेश सरकारने महागाई रोखण्यासाठी भारतातून तांदळाची आयात वाढवण्यासाठी शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश सरकारने २२ जून रोजी एक अधिसूचना जारी केली होती. ३१ ऑक्टोबरपर्यंत बिगर बासमती तांदूळ आयात करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे. बांगलादेश सरकारने तांदूळ आयातीवरील आयात शुल्क आणि शुल्क ६२.५ टक्क्यांवरून केवळ २५ टक्क्यांवर आणले आहे.

बांगलादेशने पहिल्यांदाच भारताकडून खूप लवकर तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशला भीती आहे की, देशांतर्गत बाजारातील महागाई नियंत्रित करण्यासाठी भारत तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घालू शकतो. साधारणपणे बांगलादेश सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात तांदूळ आयात करतो.

रशिया-युक्रेन युद्ध आणि भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर बांगलादेशमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. बांगलादेशातील अनेक भाग सध्या पुराच्या विळख्यात आहेत. त्यामुळे तेथील भातशेती प्रभावित झाली आहे. वृत्तानुसार, तांदूळ निर्यात असोसिएशनचे अध्यक्ष बीव्ही कृष्णा राव यांनी सांगितले की, बांगलादेशातून आयात सुरू झाल्याच्या वृत्तानंतर गेल्या ५दिवसांत भारतात गैर-बासमती तांदळाची किंमत वाढली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in