धुक्यामुळे रस्ते अपघात, उत्तर प्रदेशात ६ ठार

आग्रा येथे राष्ट्रीय महामार्गावर सुमारे डझनभर वाहनांना धुक्यामुळे अपघात झाला असून त्यात एकाचा मृत्यू झाला
धुक्यामुळे रस्ते अपघात, उत्तर प्रदेशात ६ ठार
PM

बागपत : उत्तर प्रदेशात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी दाट धुक्यामुळे विविध भागांमध्ये वेगवेगळ्या रस्त्यांवर झालेल्या वाहन अपघातात सहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले. बरेली जिल्ह्यातील हाफिजगंजमध्ये मोटारसायकलला ट्रॅक्टरने धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला आणि एक पुरुष जखमी झाला.

सुनीता देवी (३५) आणि प्रभा देवी (३६) यांचा बुधवारी सकाळी ट्रॅक्टरने धडक दिल्याने ते जागीच मृत्यू झाला तर अन्य एक व्यक्ती जखमी झाली, असे  पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मुकेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले. ट्रॅक्टर ड्रायव्हरला दाट धुक्यात मोटारसायकल दिसत नव्हती. त्यामुळे ही दुर्घटना झाली.

उन्नावमध्ये काल रात्री आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर तीन बस, एक कंटेनर ट्रक आणि दोन कारच्या झालेल्या भीषण अपघातात एक व्यक्ती ठार आणि किमान १५ जण जखमी झाले. बांगरमाऊ पोलिस स्टेशनचे एसएचओ ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितले की, "दाट धुक्यामुळे कमी दृश्यमानतेमुळे बस एका कंटेनर ट्रकला पाठीमागून धडकली. नंतर दोन अन्य बसेस बसला धडकल्या. पश्चिम उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात, खेकरा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या भागात एका ट्रकला धडक दिल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले.

आग्रा येथे राष्ट्रीय महामार्गावर सुमारे डझनभर वाहनांना धुक्यामुळे अपघात झाला असून त्यात  एकाचा मृत्यू झाला आणि इतर सहा जण जखमी झाले, धुक्यामुळे ट्रान्स-यमुना पोलिस स्टेशन परिसरातील शाहदरा पुलावर पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलिस उपायुक्त (आग्रा शहर) सूरज कुमार राय यांनी सांगितले. इटावामध्ये, बुधवारी सकाळी जिल्ह्यातील जसवंतनगर भागात आग्रा-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने धडक दिल्याने तीन जण जखमी झाले. हे सारे अपघात दाड धुक्यामुळे झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in