रॉबर्ट वाड्रांविरोधात ED चे आरोपपत्र; ५८ कोटींच्या अवैध कमाईचा आरोप

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांचे पती व व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांनी ५८ कोटींची बेकायदेशीर कमाई केल्याचा दावा ‘ईडी’ने आरोपपत्रात केला आहे. वाड्रा यांनी हे पैसे मालमत्ता खरेदी करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांच्या समूह कंपन्यांना कर्ज देण्यासाठी आणि त्यांचे कर्ज फेडण्यासाठी वापरले, असा आरोपही ईडीने केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांचे पती व व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांनी ५८ कोटींची बेकायदेशीर कमाई केल्याचा दावा ‘ईडी’ने आरोपपत्रात केला आहे. वाड्रा यांनी हे पैसे मालमत्ता खरेदी करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यांच्या समूह कंपन्यांना कर्ज देण्यासाठी आणि त्यांचे कर्ज फेडण्यासाठी वापरले, असा आरोपही ईडीने केला आहे.

रॉबर्ट वाड्रा यांनी ५८ कोटी रुपये बेकायदेशीर मार्गाने कमावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ५८ कोटींपैकी पाच कोटी रुपये ‘ब्लू ब्रीज ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड’च्या मार्गाने आणि ५३ कोटी रुपये ‘स्काय लाइट हॉस्पिटालिटी प्रायव्हेट लिमिटेड’च्या माध्यमातून वाड्रांच्या व्यवसाय क्षेत्रात पोहचले. या दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम कायदेशीर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या कंपन्यांच्या नावे आधीच काही गुन्हे आहेत. त्यामुळे हे प्रकरण समोर आले. त्यामुळे आता वाड्रांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

रॉबर्ट वाड्रा यांनी ‘स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी’ आणि ‘बीबीटीपीएल’ या कंपन्यांमार्फत आर्थिक अफरातफर करुन ५८ कोटींची बेकायदेशीर कमाई केली. ही रक्कम त्यांनी त्यांच्या आलिशान राहणीमानासाठी खर्च केली.

आर्थिक अफरातफर नेमकी कशी करण्यात आली याचा तपास ईडीकडून केला जात आहे. या दोन कंपन्यांमार्फत रॉबर्ट वाड्रा यांनी स्थावर आणि जंगम अशा दोन्ही मालमत्ता खरेदी केल्याचाही आरोप ईडीने आरोपपत्रात केला आहे.

बेकायदेशीर मार्गाने केलेली कमाई ही आर्थिक अफरातफर मानली जाते. त्यामुळे अशाप्रकारे संपत्ती जमा करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने वाड्रांच्या अडचणी वाढल्या आहेत.

आरोप सिद्ध झाल्यास वाड्रांना ‘पीएमएलए’ कायद्यातंर्गत शिक्षा

ईडीने आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असून त्यावर आता सुनावणी होईल. न्यायालयात हे आरोप सिद्ध झाल्यास वाड्रा यांच्यावर ‘पीएमएलए’ कायद्यातंर्गत शिक्षा होऊ शकते. दरम्यान, वाड्रा यांनी या आरोपांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in