बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंगला संरक्षण; अखिलेश यादवांची भेट घेऊन संसदेत आवाज उठवण्याची केली मागणी - रोहित पवार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान पडले की पाडले गेले, हा आमचा साधा प्रश्न आहे, असे स्पष्ट करून आमदार रोहित पवार यांनी सोमवारी 'व्हीएसआर' कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केले आहे. बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंगला संरक्षण असल्याचा दावाही रोहित पवारांनी केला.
बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंगला संरक्षण; अखिलेश यादवांची भेट घेऊन संसदेत आवाज उठवण्याची केली मागणी - रोहित पवार
बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंगला संरक्षण; अखिलेश यादवांची भेट घेऊन संसदेत आवाज उठवण्याची केली मागणी - रोहित पवार
Published on

नवी दिल्ली : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान पडले की पाडले गेले, हा आमचा साधा प्रश्न आहे, असे स्पष्ट करून आमदार रोहित पवार यांनी सोमवारी 'व्हीएसआर' कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केले आहे. बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंगला संरक्षण असल्याचा दावाही रोहित पवारांनी केला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी दिल्लीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेऊन हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची मागणी केली.

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी तांत्रिक बाबींवर बोट ठेवले. ते म्हणाले, अपघाताच्या दिवशी दृष्यमानता ५ हजारच्या खाली असताना कॅप्टन कपूर यांनी व्ही. के. सिंग यांना फोन केला होता. 'व्हिजिबिलिटी खराब आहे, मी उड्डाण करू शकत नाही' असे वैमानिकाने स्पष्ट सांगितले होते. मात्र, त्यावर व्ही. के. सिंग यांनी 'तू टेकऑफ कर, बाकी नंतर पाहून घेतो' असा आदेश दिला. सीआयडीने व्ही. के. सिंग यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले, तर हे संभाषण समोर येईल., असेही पवार म्हणाले.

वैमानिकावर दबाव?

वैमानिक कपूर यांच्याबद्दल रोहित पवार म्हणाले की, कपूर पूर्वी मद्यप्राशन करायचा याचे पुरावे आम्ही दिले आहेत. मात्र, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, अजितदादांचे विमान उडवत असताना त्याच्या रक्तात दारू, ड्रग्ज किंवा विष आढळलेले नाही.

राजस्थान कनेक्शन उघड

व्ही. के. सिंग यांना जाणीवपूर्वक वाचवले जात असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी 'राजस्थान कनेक्शन' उघड केले. व्ही. के. सिंगचा मुलगा रोहित सिंग याच्या लग्नात कुणीही जाऊ शकतो, हे मी समजू शकतो. पण आज जे सत्तेत आहेत, ते लोक रोहित सिंगच्या लग्नात गेले असतील, तिथे लग्नात अहुजा नावाचा सिंगर गाणे गात असताना प्रफुल पटेल तर होतेच, त्याचबरोबर त्यांचा मित्र एस. एन. शर्मा हाही त्या लग्नाला होता. यासोबतच अनेक मोठमोठे नेतेही होते, असे पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in