

नवी दिल्ली : बारामती विमानतळावर झालेल्या अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच लावून धरला आहे. गुरुवारी त्यांनी दिल्लीत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली.
तसेच जय पवार यांच्यावरही दबाव असल्याचे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी राहुल गांधींशी झालेल्या चर्चेत पोलीस प्रशासन आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विमान दुर्घटनेप्रकरणी डीजीसीएला कलम १२ अंतर्गत एक विशेष समिती स्थापन करण्याचा अधिकार आहे.
जय पवारांवर दबाव असल्याचा दावा
अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना पत्रकार परिषद घेऊ नका, असे सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर नेमका दबाव कुणाचा आहे? भाजपने सांगितले की त्यांच्याच पक्षाने, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, पीडित कुटुंबाला बोलण्यापासून रोखले जात आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे, असेही ते म्हणाले.