रोज व्हॅली हॅटेल्स संचालकांची खाती गोठावली

रोज व्हॅली हॅटेल्स संचालकांची खाती गोठावली
Published on

सेबीने रोज व्हॅली हॉटेल्स आणि एंटरटेन्मेमेंट लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांची बँक खाती, शेअर्स व म्युच्युअल फंड खाती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. गुंतवणूकदारांना हजार कोटी रुपयांचा चुना लावण्याप्रकरणी सेबीने ही कारवाई केली आहे.

सेबीने रोज व्हॅलीचे तत्कालिन संचालक गौतम कुंडू, अशोक कुमार साहा, शिबमय दत्ता व अबीर कुंडू यांची बँक खाती, शेअर्स व म्युच्युअल फंडातून पैसे काढायला परवानगी देण्यास नकार दिला आहे. तसेच सेबीने सर्व बँकांना ‘डिफॉल्डर’च्या लॉकरसमवेत सर्व खाती जप्त करण्याचे आदेश दिले. नोव्हेंबर २०१७ मध्ये रोज व्हॅली व त्यांच्या संचालकांना गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये पैसे परत देण्याचे आदेश दिले होते. गुंतवणूकदारांनी हा पैसा समूहाच्या हॉलिडे मेंबरशीप योजनेत गुंतवले होते. या योजनांना बेकायदेशीर घोषित केले होते.

logo
marathi.freepressjournal.in