एकीकडे महाराष्ट्रमध्ये पोटनिवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष असताना दुसरीकडे नागालँड निवडणुकीत (Nagaland) पहिल्यांदाच उतरलेल्या मंत्री रामदास आठवलेंच्या (Ramdas Athawale) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (RPI) तब्बल २ जागांवर विजय मिळवला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आरपीआयच्या २ उमेदवारांनी राज्याबाहेर विजय मिळवला आहे.
महाराष्ट्राबाहेर रामदास आठवलेंच्या आरपीआयचा विजय हा त्यांच्यासाठी खूप मोठा विजय असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे इतर राज्यामधील निकालांवर याचा परिणाम होऊ शकतो. आरपीआय आठवले गटाच्या इमतीछोबा यांनी तुनसंग सदर २ या विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला.
तर उमेदवार वाय लीमा ओनेने चांग यांनी नोकसेन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पहिल्यांदाच आरपीआयने नागालँडमध्ये निवडणूक लढवली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दोन जागा जिंकल्याने सध्या त्यांच्या पक्षात आनंदाचे वातावरण आहे.