कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना केंद्र सरकारने काही ठोस पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला
कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर
Published on

चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. अशामध्ये आता भारत केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केला आहेत. त्यांनी जाहीर केले, परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग होणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. कोरोनाचा परदेशात वाढत प्रादुर्भाव पाहता हे महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत.

आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असणार आहे. विमानतळावर या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास किंवा कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाणार आहे. देशामध्ये सध्या ३३९७ कोरोना रुग्ण सक्रिय असून सध्यातरी लॉकडाऊनसारखी पाऊले सरकार उचलणार नसल्याचे स्पष्ट दिसते आहे. यापूर्वीही केंद्र सरकारकडून घाबरण्याचे काही कारण नसून फक्त खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in