
भोपाळ : काँग्रेस नेते कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुल नाथ यांच्या भाजप प्रवेशासंबंधातील बातम्यांबद्दल मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी त्या तथ्यहीन असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शनिवारी येथे एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. एकंदर कमलनाथ यांच्या संबंधात आता मध्य प्रदेशातील काँग्रेस वर्तुळातही मोठ्या चर्चेला ऊत आला आहे.
यावेळी कमलनाथ हे काँग्रेससोबत आहेत व राहतील या संबंधात दावे करताना त्यांनी सांगितले की, कमलनाथ यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, कमलनाथ हे त्यांचे तिसरे पुत्र आहेत. कमलनाथ यांच्या ४५ वर्षांच्या राजकीय प्रवासात, आमच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही काळात ते काम करत आहेत. गेल्या सात वर्षांपासून ते मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मला अजूनही आठवते की, जेव्हा सिंधिया यांनी मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडले, तेव्हा सर्व काँग्रेस कार्यकर्ते कमलनाथ यांच्या नेतृत्व आणि विचारसरणीच्या पाठीशी उभे होते.
मी अशी विनंती करू इच्छितो की, ज्या बातम्या बिनबुडाच्या आहेत त्या बिनबुडाच्या आहेत, हे लक्षात घ्यावे. असे सांगून पटवारी म्हणाले की, इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस कशी सोडेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? स्वप्नातही असा विचार करू शकत नाही.
कमलनाथ यांचे जवळचे सहकारी आणि काँग्रेस नेते सज्जन सिंग वर्मा यांनी इंदूरमध्ये एएनआयला सांगितले की, हा फक्त अंदाज आहे. राजकारणात तीन गोष्टी काम करतात- आदर, अपमान आणि स्वाभिमान, जेव्हा या गोष्टी दुखावल्या जातात तेव्हा माणूस आपले निर्णय बदलतो. गेल्या ४५ वर्षांत काँग्रेस आणि देशासाठी खूप काही केलेले असे सर्वोच्च राजकारणी जेव्हा विचार करतात. पक्षापासून दूर जाणे, मग त्यामागे तिन्ही घटक काम करतात. म्हणून कमलनाथ जाणार आहेत असा कोणताही निर्णय झालेला नाही, नुसती अटकळ आहे.