रुपयाच्या घसरणीला हाताळता येणार; अर्थ सचिव

विदेशी गंगाजळी सलग सातव्या आठवड्यात १६ सप्टेंबर रोजी घसरुन ५४५.६५ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढे झाले
 रुपयाच्या घसरणीला हाताळता येणार; अर्थ सचिव
Published on

भारताकडे मोठ्या प्रमाणावर विदेशी गंगाजळी आहेत. रुपयाच्या घसरणीला हाताळता येण्यासाठी ही गंगाजळी पुरेशी आहे, असे आर्थिक कामकाज सचिव अजय सेठ यांनी मंगळवारी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी भारताकडील गंगाजळीत मोठी घसरण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. विदेशी गंगाजळी सलग सातव्या आठवड्यात १६ सप्टेंबर रोजी घसरुन ५४५.६५ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढे झाले आहे.

गंगाजळीत घसरण होत असली तरी रिझर्व्ह बँक रुपयाची घसरण थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे गंगाजळीत २.२३ अब्ज डॉलर्सने घसरुन मागील आठवड्यात ५५०.८७ अब्ज डॉलर्स झाली आहे. व्यापारतूट वाढली आहे, कारण विदेशी गुंतवणुकीचा ओघ घटला आहे. त्यामुळे मला वाटत नाही की, फार काही चिंता करण्याची गरज आहे. कारण भारताकडे भारतीय चलनाची स्थिती हाताळण्यासाठी पुरेशी गंगाजळी आहे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in