डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपयाने नवा नीचांक गाठला

बाकीच्या देश चलनाच्या तुलनेत रुपयाने डॉलरच्या तुलनेत चांगली पकड घेतली आहे.
डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपयाने नवा नीचांक गाठला

अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपयाचा नवा नीचांक झाला आहे. त्यासाठी भारतातील आर्थिक घडामोडींचा काहीही संबंध नाही, असे एसबीआय रिसर्चच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, रुपयाची वाढती घसरण आणि नवी नीचांकी पातळी पाहता त्याला बळ मिळण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.

सध्या देशात डॉलरच्य तुलनेत रुपयाच्या दरांमध्ये घट झालीय यावर त्या म्हणाल्या की, आमच्या चलनावर चांगली पकड आहे. बाकीच्या देश चलनाच्या तुलनेत रुपयाने डॉलरच्या तुलनेत चांगली पकड घेतली आहे. अर्थमंत्रालय या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे, असेही त्या म्हणाल्या.

तीन सत्रात रुपया १२४ पैशांनी कोसळला

भारतीय चलन रुपयामध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३८ पैशांनी घसरून ८१.२४ या सार्वकालिक नव्या नीचांकी पातळीवर आला होता. मात्र, व्यवहाराच्या अखेरीस रुपया १९ पैशांनी घसरुन ८०.९८वर बंद झाला. गेल्या तीन सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल १२४ पैशांनी घसरला आहे. रुपयाची गेल्या सात महिन्यांतील ही सर्वात खराब कामगिरी ठरली आहे.

गुरुवारी रुपया सात महिन्यातील एका दिवसातील सर्वाधिक ८३ पैशांनी घसरुन ८०.७९ या नव्या नीचांकी पातळीवर पोहचला होता. आयातदारांमध्ये डॉलरची मागणी वाढली आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंड यांनी व्याजदरात वाढ केली आहे. युक्रेनमध्ये भूराजकीय तणाव वाढला आहे. याचा परिणाम गुंतवणुकीवर झाला आहे. गुंतवणूकदार कुठलीही जोखीम घ्यायला तयार नाहीत. विदेशी बाजारात अमेरिकन करन्सी, डॉलर मजबूत अवस्थेत आहे. भारतीय शेअर बाजारात घसरण सुरु आहे. सोने-चांदीचे दर वाढले. एकंदरीतच मंदीची आशंका प्रबळ आहे. त्यामुळे रुपयाची घसरण सुरु आहे. रुपयाची घसरण एका मोठ्या आर्थिक संकटाची चाहूल तर नाही ना, याविषयी तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. काहींच्या मते, इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपया अजूनही मजबूत स्थितीत आहे. तर रुपयाच्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. तसेच देशातंर्गत आयात होणाऱ्या वस्तूंवरही त्याचा परिणाम दिसून येईल. त्यामुळे महागाईच्या मोर्चावर सरकारची आणि सर्वसामान्यांची दमछाक होणार हे नक्की.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in