ताबा मिळविण्यात अपयश आल्याने रशियन सैन्याची माघार

युक्रेनच्या प्रत्युत्तराने रशियाने लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त आहे.
 ताबा मिळविण्यात अपयश आल्याने रशियन सैन्याची माघार

युक्रेनवर ताबा मिळविण्यात रशियाला अपयश आले आहे. त्यामुळेच रशियन सैन्याने खार्किव येथून माघार घेतली आहे. गेल्या आठवड्यापासून खार्किवमध्ये रशियन सैन्याची पकड कमी झाली आहे. युक्रेनच्या प्रत्युत्तराने रशियाने लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त आहे.युक्रेनच्या इझुम भागातून सैन्य माघारी बोलावल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. खार्किवमधील हा भाग रशियन सैन्यासाठी प्रामुख्याने मोठा सुरक्षित तळ होता. रशियाकडून आता डोनेस्तकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात आले. दरम्यान, यापूर्वीदेखील मार्च महिन्यात रशियन संरक्षण मंत्रालयाने कीवमधून सैन्य मागे घेतले होते. तेव्हा असेच विधान मंत्रालयाकडून करण्यात आले होते.

रशियन सैन्य माघारी फिरल्याने हा युक्रेनचा विजय मानला जात आहे. युक्रेनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, खार्किव भागात आमच्या सैन्याने मोठा विजय मिळवला आहे. एप्रिल महिन्यात रशियन सैन्याने इझुम हा भाग ताब्यात घेतला. आता आमच्या सैनिकांनी इझुम पुन्हा परत मिळवला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांत रशियाने लष्कर मागे घेण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. हे करून रशियाने आपली सर्वोत्तम बाजू दाखवून दिली आहे. येथून पळून जाणे, हा त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे. युक्रेनमधील कोणत्याही भागावर ताबा करणाऱ्यांसाठी कधीही जागा नव्हती आणि कधीही नसणार.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in