परराष्ट्रमंत्री जयशंकरही रशियाला जाणार; भारत-अमेरिका 'ट्रेड्र वॉर'मुळे दौऱ्याला महत्त्व

काही दिवासांपूर्वीच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाला भेट दिली आणि त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन तसेच मॉस्कोमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे देखील रशियाला जाणार...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : काही दिवासांपूर्वीच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रशियाला भेट दिली आणि त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन तसेच मॉस्कोमध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे देखील रशियाला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एस जयशंकर हे तेथे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांना भेटणार आहेत.

भारत-रशिया वाढत्या व्यापारी संबंधांमुळे नाराज झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, भारतावर अन्यायकारकरित्या ५० टक्के टॅरिफ लादला आहे. ज्यामुळे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये काहीशी कटुता निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले की, २१ ऑगस्ट रोजी मॉस्कोमध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in