सचिनचा साधेपणा आणि चुलीवरील जेवण, हा व्हिडीओ पाहिलात का ?

इतकं तूप मी आयुष्यात कधीच खाल्लं नाही. पण हे तूप प्रेमाने खाणार, असे म्हणत सचिन तेंडुलकरचा आवाज
सचिनचा साधेपणा आणि चुलीवरील जेवण, हा व्हिडीओ पाहिलात का ?
Published on

क्रिकेटर सचिन तेंडुलकर अप्रतिम खेळासोबतच त्याच्या स्वभावातील साधेपणासाठी ओळखला जातो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर राजस्थानमधील चुलीवरच्या स्वयंपाकाचा आस्वाद घेताना दिसत आहे. तसेच स्वयंपाक करणाऱ्या महिलांशी त्याने संवाद साधला. सचिन तेंडुलकरनेही हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये त्याने चुलीवर शिजवण्याची चव काहीशी नितळ असल्याचे म्हटले आहे.

सचिनने केलेल्या वर्णनानुसार तुम्ही पोळ्या कशापासून बनवत आहात? गहू आणि बाजरी पासून महिलांनी सांगितले. चुलीवर स्वयंपाक करताना वेगळीच चव असते. त्याला देशी तुपाचा वास आला. इतकं तूप मी आयुष्यात कधीच खाल्लं नाही. पण हे तूप प्रेमाने खाणार, असे म्हणत सचिन तेंडुलकरचा आवाज ऐकू येतो. व्हिडिओमध्ये सचिन चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांशी संवाद साधत आहे. या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. या व्हिडिओला 6 लाख 68 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. काही युजर्सनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in