
केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये युवा, प्रतिभाशाली, दूरदर्शी विचारसरणी असलेल्या तसेच चैतन्यशील व्यावसायिकांना संधी देण्याची योजना तयार केली आहे. या योजनेत तरूण व्यावसायिकांना वास्तवातील प्रत्यक्ष शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. सरकारची कार्यशैली आणि विकासात्मक धोरणविषयक मुद्यांबाबत शिकण्याची संधी व्यावसायिकांना मिळेल. मंत्रालयाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी इतर मुद्यांसह पायाभूत सुविधा, विदा(ड़ेटा) विश्लेषण, प्रकल्प व्यवस्थापन, स्टार्टअप्स, नाविन्यपूर्ण संशोधन, कौशल्य विकास, डिजिटल परिवर्तन आणि पर्यावरण या क्षेत्रांत व्यावसायिकांनी उच्च गुणवत्ता असलेल्या सूचनांनुसार काम करण्याची आवश्यकता आहे.
ही योजना निर्णय प्रक्रियेत तरूण व्यावसायिकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणार आहे. यामुळे वैयक्तिक स्तरावर, स्वयंप्रतिष्ठा आणि सक्षमीकरणाची जाणीव यांना चालना देऊन सामाजिक कल्याणात पुढील योगदान दिले जाईल. त्याचबरोबर, सामायिक मुद्यांवर अधिक जनजागृती आणि दीर्घकालीन उपयुक्त ठरतील असे तोडगे निश्चित करण्यासाठी संयुक्त निर्धार करण्यासारखे महत्वाचे लाभही मिळणार आहेत. सुरूवातीला, या योजनेंतर्गत २५हून अधिक व्यावसायिकांची भरती केली जाईल.