साकेत कोर्टातील कोठडीत हाणामारी; एका कैद्याचा मृत्यू, पूर्ववैमनस्यातून झाला हल्ला

दिल्‍ली येथील साकेत न्यायालयाच्या लॉकअपमध्‍ये कैद्याची हत्‍या झाल्‍याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली. अन्‍य दोन कैद्यांनी अमन नावाच्या कैद्याची हत्या केली. दोघेही तिहार तुरुंग क्रमांक ८ मध्ये कारावासाची शिक्षा भोगत होते. दोघांनाही न्यायालयीन कामकाजासाठी साकेत न्यायालयात आणण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे.
साकेत कोर्टातील कोठडीत हाणामारी; एका कैद्याचा मृत्यू, पूर्ववैमनस्यातून झाला हल्ला
Published on

नवी दिल्ली : दिल्‍ली येथील साकेत न्यायालयाच्या लॉकअपमध्‍ये कैद्याची हत्‍या झाल्‍याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली. अन्‍य दोन कैद्यांनी अमन नावाच्या कैद्याची हत्या केली. दोघेही तिहार तुरुंग क्रमांक ८ मध्ये कारावासाची शिक्षा भोगत होते. दोघांनाही न्यायालयीन कामकाजासाठी साकेत न्यायालयात आणण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे. या घटनेने कोर्टाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

दिल्‍ली पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हत्‍याप्रकरणी अटकेत असणाऱ्या दोघांना न्यायालयीन कामकाजासाठी साकेत न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी त्‍यांना साकेत कोर्टाच्‍या लॉकअपमध्‍ये ठेवण्‍यात आले. साकेत कोर्ट लॉकअपच्या खारजा क्रमांक ५ मध्ये मारहाणीची घटना घडली. अमनला न्यायालयात हजर करण्यासाठी लॉकअपमध्ये आणण्यात आले होते. जितेंद्र आणि जयदेव या कैद्यांनी अमनवर हल्‍ला केला. यामध्ये त्‍याचा मृत्‍यू झाला. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा कोठडीमध्ये अनेक कच्चे कैदी होते. अमनवर हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे जितेंद्र उर्फ जित्ते आणि जयदेव उर्फ बच्चा अशी आहेत.

पूर्ववैमनस्यातून हत्‍या

तुरुंगाबाहेर असताना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे जितेंद्र आणि अमन यांच्यात वैमनस्य होते. अमनने जितेंद्र आणि त्याच्या भावावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप होता. याच पूर्ववैमनस्यातून जितेंद्र आणि जयदेव या कैद्यांनी अमनवर हल्‍ला केला. यामध्‍ये त्‍याचा मृत्‍यू झाला, अशी प्राथमिक माहिती दिल्‍ली पोलिसांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in