एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँकेत पगारवाढीचा करार

एन.के.जी.एस.बी. को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड व को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉयी युनियन, मुंबई यांच्यामध्ये नुकताच पगारवाढीसाठी ३ वर्षांसाठी करार झाला.
एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँकेत पगारवाढीचा करार

मुंबई : एन.के.जी.एस.बी. को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड व को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉयी युनियन, मुंबई यांच्यामध्ये नुकताच पगारवाढीसाठी ३ वर्षांसाठी करार झाला. हा करार २०२३-२६ या कालावधीसाठी लागू आहे. बँकेच्या वतीने अध्यक्षा सीए हिमांगी नाडकर्णी, उपाध्यक्ष सीए शांतेश वर्टी व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक सुनील पानसे आणि को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉयी युनियन, मुंबईचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ व सल्लागार कॅप्टन अभिजीत अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, एन के जी एस बी एम्प्लॉयी युनिअनचे संघटक सचिव अमूल प्रभू व इतर कार्यकारी मंडळाचे सभासद उपस्थित होते. हा करार ३१ जानेवारी २०२४ रोजी यशस्वीरीत्या झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in