लवकरच एनएचपीसीमधील ३.५ टक्के हिस्सा विक्री; सरकारला मिळणार २३०० कोटी

तुहिन कांत पांडे यांनी म्हटले की, एनएचपीसीमध्ये बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ऑफर फॉर सेल (ओएफएस) गुरुवारपासून सुरू होईल.
लवकरच एनएचपीसीमधील ३.५ टक्के हिस्सा विक्री; सरकारला मिळणार २३०० कोटी

नवी दिल्ली : केंद्र सरकार वीज निर्मिती कंपनी एनएचपीसीमधील ३.५ टक्के भागभांडवल किमान ६६ रुपये प्रति शेअर या दराने विकणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीत २३०० कोटी रुपये जमा होतील, असे सरकारने बुधवारी सांगितले. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे.

तुहिन कांत पांडे यांनी म्हटले की, एनएचपीसीमध्ये बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ऑफर फॉर सेल (ओएफएस) गुरुवारपासून सुरू होईल. किरकोळ गुंतवणूकदार शुक्रवारी बोली लावू शकतात. सरकार ३.५८ टक्के इक्विटी निर्गुंतवणूक करणार आहे. एक टक्का ग्रीनशू ऑप्शन आहे. म्हणजेच अधिक सबस्क्रिप्शन आल्यास एक टक्का अतिरिक्त बोली लावता येईल. सरकार ओएफएसचा भाग म्हणून एनएचपीसीमधील २५ कोटी इक्विटी शेअर्स विकणार आहे. यामध्ये ‘ग्रीनशू’ ऑप्शन अंतर्गत १० कोटी रुपये अधिक विकले जाऊ शकतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in