यूपी पोलिसांची मोठी कारवाई; मुंबईत येऊन अब सालेमच्या पुतण्याला उचलले

मुंबईच्या वांद्रे हिल रोडवरुन सालेमच्या पुतण्याला अटक केली आहे
यूपी पोलिसांची मोठी कारवाई; मुंबईत येऊन अब सालेमच्या पुतण्याला उचलले

उत्तर प्रदेशात पोलिसांसमोर गोळ्या झाडून गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची हत्या करण्यात आली. यानंतर यूपी पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. या अंतर्गत जागोजागी शोधमोहीम करण्याचे काम सुरु आहे. यावेळी कोणी गोळीबार केला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याचा एन्काऊंटर केले जात आहे.

या कारवाई अंतर्गत उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी मुंबई येऊन धडक कारवाई केली आहे. युपी पोलिसांकडून गॅंगस्टर अबू सालेमच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. त्यांनी मुंबईच्या वांद्रे हिल रोडवरुन सालेमच्या पुतण्याला अटक केली आहे. आरिफ असे अटक केलेल्या सालेमच्या पुतण्याचे नाव आहे. आरिफ हा अनेक वर्षापासून फरार होता. यूपी पोलीस अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर होते. एवढेच काय तर त्याला पकडण्यासाठी यूपी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली होती. त्यांना तो मुंबईत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जाळे टाकत त्याला ताब्यात घेतले आहे.

आरिफ मुंबईत असल्याची माहिती युपी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत मुंबईत पोलिसांशी संपर्क करुन त्यांना याबाबची माहिती दिली. आरिफ याला पकडण्यासाठी यूपीहून पोलिसांची एक तुकडी ही मुंबईला आली. यावेळी मुंबई पोलिसांनी यूपी पोलिसांना आरिफची सगळी माहिती दिली. यावरुन आरिफ मुंबईच्या वांद्रे येथील एका हॉटेलजवळील पानटपरीवर उभा असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली.

आरिफला संशय येऊ नये यासाठी यूपी पोलीस साध्या वेशात त्या ठिकाणी गेले होते. यावेळी पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन आरिफला पकडले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ठिकाणी अन्य काही लोक उभे असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in