प्रवासी वाहनांच्या विक्रीत जुलैमध्ये झाली जोरदार वाढ

होंडा कार्स इंडियाच्या देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीत जुलैमध्ये १२ टक्के वाढ झाली.
 प्रवासी वाहनांच्या विक्रीत जुलैमध्ये झाली जोरदार वाढ

सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचे प्रमाण कमी झाल्याने मारुती सुझुकी, ह्युंडाई, टाटा मोटर्स आणि महिंद्रा ॲण्ड महिंद्रा यांच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत जुलैमध्ये एक ते दोन अंकी वाढ झाली, असे सोमवारी जाहीर करण्यात आले. अन्य उत्पादक किया इंडिया, टोयाटो किर्लोस्कर मोटार (टीकेएम) होंडा कार्स इंडिया, स्कोडा ॲटो इंडिया आदी कंपन्यांच्या देशांतर्गत विक्रीत उत्तम वाढ झाली. मारुती सुझुकी इंडियाच्या देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीत गेल्या महिन्यात ६.८२ टक्के वाढ होत १,४२,८५० युनिटस‌् झाली. जुलै २०२१ मध्ये १,३३,७३२ युनिटस‌्ची विक्री झाली.

होंडा कार्स इंडियाच्या देशांतर्गत प्रवासी वाहन विक्रीत जुलैमध्ये १२ टक्के वाढ झाली. कंपनीने ६,७८४ युनिटस‌् विकले. तसेच सिटी आणि अमेझ यांची गेल्या महिन्यात २,१०४ युनिटस‌्ची निर्यात करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in