निवडणूक आयोगाची पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘अदलाबदली’

संजय मुखर्जी हे १९८९ च्या तुकडीचे पोलीस सेवेतील अधिकारी असून पश्चिम बंगाल सरकारने ज्या तीन जणांची नावे यादीत समाविष्ट केली होती, त्या यादीत संजय मुखर्जी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते.
निवडणूक आयोगाची पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ‘अदलाबदली’

कोलकाता : पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकपदी विवेक सहाय यांच्या नियुक्तीची घोषणा करून २४ तास उलटण्याच्या आतच निवडणूक आयोगाने त्यांना पदावरून दूर करून त्यांच्याऐवजी संजय मुखर्जी यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

विवेक सहाय यांची नियुक्ती सेवाज्येष्ठतेवर आधारित होती, त्यांचा कार्यकाळ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात संपत आहे, मात्र तोपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालक म्हणून संजय मुखर्जी यांचे नाव सुचविले.

संजय मुखर्जी हे १९८९ च्या तुकडीचे पोलीस सेवेतील अधिकारी असून पश्चिम बंगाल सरकारने ज्या तीन जणांची नावे यादीत समाविष्ट केली होती, त्या यादीत संजय मुखर्जी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. या आदेशाची अंमलबजावणी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करावयाची आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in